वेलगुर फाट्याजवळ अज्ञातांनी बसवाहकाकडून लूटले 13 हजार

0
11

गडचिरोली,दि. १ :मुलचेरा मार्गे येणाऱ्या नागपुर अहेरि बसला आलापल्ली पासून ५ किमी वर वेलगुर फाट्यावर अज्ञात इसमानि लुटल्याची घटना काल रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास घडली. काल रात्रीच्या सुमारास वेलगुर फाट्याजवळ अज्ञातांनी लाकडे टाकून रस्ता अडविला. दरम्यान नागपुर-मुलचेरा-अहेरी बस या मार्गावरून जात असतांनाकडे रस्त्यावरील लाकडे बाजूला करण्यासाठी वाहक,चालक खाली उतरले असता जंगलात दबा धरून असलेल्या लुटारूनी बंदूकीच्या धाकावर वाहकाकड़े असलेली १३ हजार रुपयाची रक्कम लुटुन पोबारा केला.यावेळी बस मध्ये एकच प्रवासी होता.