प्रयोगशाळा सहाय्यकाची वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्या

0
17

भंडारा,दि.06ः-लाखनी येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेअंतर्गत चालविल्या जाणार्‍या सर्मथ महाविद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक प्रदीप उर्फ पप्पू नत्थूजी फरांडे (५0) रा. सर्मथ नगर लाखनी यांनी कारधा येथील वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास स्मशानभूमी जवळील नदी काठावर आढळून आला.
प्रदीप फरांडे हे कुटूंबियांना बाहेरगावी जात असल्याचे सांगून घरून रविवारी सकाळी निघाले. त्यानंतर ते घरी परतले नाही. दरम्यान सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह वैनगंगा नदीच्या स्मशानभूमीच्या काठावर नावाड्यांना आढळून आला. याबाबतची माहिती कारधाचे पोलिस पाटील यांना माहिती होताच त्यांनी कारधा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. नदीकाठावरील एका झाडाला प्रदीप फरांडे यांचा शर्ट लटकविला होता. शर्टच्या खिशात त्यांचे नाव व मोबाईल नंबर लिहीलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रूग्णालयात रवाना केले. कारधा पोलिसांनी र्मग दाखल केला असून तपास पोलीस हवालदार सेलोकर करीत आहेत.
प्रदीप फरांडे हे राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कार्यवाह स्व. न.ता. फरांडे यांचे द्वितीय चिरंजीव होते. ते अनेक दिवसांपासून नैराश्येत असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.