भिंत कोसळली दोघांचा मृत्यू

0
14

पवनी,दि.23ः- भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना पवनी पोलिस स्टेशनअंतर्गत मोखारा येथे रविवारी (ता.२२) पहाटे ६ वाजताच्या सुमारास घडली.
देवलाबाई नखाते (६0) व भगवान बोरकर (७५) अशी मृतकांची नावे आहेत.मोखारा येथील रहिवासी देवलाबाई नखाते हिला २0१७-१८ या वर्षाकरिता पंतप्रधान आवास योजना मंजूर करण्यात आली. तिच्या नावाने बँकेत प्रथम धनादेश पण जमा झाले. मात्र, जुने घर खोलत असताना भिंत कोसळल्यामुळे नखाते हिचा जागीच मृत्यू तर मजूर म्हणून काम करणारा भगवान बोरकर गंभीररित्या जखमी झाला.त्याला पवनी येथील रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पवनी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास पोलीस हवालदार चौधरी करीत आहेत.