24.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home गुन्हेवार्ता ऑटो व बोलेरो पीकअप मध्ये धडक, सहा जखमी

ऑटो व बोलेरो पीकअप मध्ये धडक, सहा जखमी

0
16

चंद्रपुर,दि.18ःः तेलंगणावरुन चंद्रपूरला आंब्याची वाहतुक करणार्या बोलोरे पीकअप व आॅटोमध्ये कोष्टाला गावाजवळ रात्री १० वाजता दरम्यान आमाेरासमोर धडक झाल्याने ऑटो चालक मारू आत्राम (वय २७ तेलंगाणा वांकडी मंडल सोनापूर) गंभीर जखमी झाला तर पाच जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. कोष्टालातील नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. ज्यामध्ये भोजू आत्राम, जैतु आत्राम, तुकाराम आत्राम,मारू सिडाम व पोचू आत्राम  अशी जखमींची नावे आहेत.सदर ऑटो मध्ये बसलेले प्रवासी हे बांगुलवाई गावातील रहिवासी असून तेलंगाणा येथील चौपणगुडा वरून साखरपुडाचे कार्यक्रम आटोपून आपल्या गावी परत येत असतांना हा अपघात घडला.