पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस शिपायाचा मृत्यू

0
13

सोयीसुविधांच्या अभावाने घेतला पोलिस शिपायाचा बळी

गोंदिया,29- भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी वर्ध्यावरून आलेल्या पोलिस शिपायाचा येथील पोलिस मुख्यालयात आज सकाळीच मृत्यू झाला. प्रकृती स्वास्थ्य आणि सोईसुविधांअभावी या शिपायाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मृत पोलिस शिपायाचे नाव अशोक सोनटक्के (वय45) बकल क्रमांक 321 असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस शिपाई अशोक सोनटक्के यांची गोंदिया जिल्ह्यात पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी ड्यूटी लावण्यात आली होती. मोरगाव अर्जूनी येथील बुथ क्र. 108 बोथली येथे त्यांनी कर्तव्य बजावल्यानंतर रात्री 1 वाजता ते गोंदिया येथील पोलिस मुख्यालयात पोचले होते. कर्तव्यावर असतानाच त्यांची प्रकृती बिघडल्याटे सांगण्यात येत आहे. गोंदिया मुख्यालयात पोचल्यावर तिथे रात्री पिण्याच्या पाण्याची सोय आणि मेस बंद असल्याने त्यांना अन्न पाण्यावाचून मैदानाच पडून राहावे लागले. सोनटक्के हे 25 तारखेला गोंदियात आल्यावर त्यांना दुसऱ्या दिवसी अर्जूनीमोर ला पाठविण्यात आले होते. उल्लेखनीय म्हणजे अशोक यांच्या मृत्यू आज सकाळीच झाला असून वर्धेच्या पोलिसांना घटनेनंतर साडे बारा वाजता रवानगी देण्यात आली, हे विशेष. दरम्यान, या घटनेविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अशोकचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे.