मोहफूल व गुळाचा सडवा केला नष्ट

0
26

सिरोंचा,दि.0१ःः तालुक्यातील बामणी उपपोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरमपल्ली येथे अवैैधरीत्या दारू काढून विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलीस व दारूबंदी संघटनेच्या महिलांनी दारू अड्ड्यांवर धाड टाकून मोहफूल व गुळाचा सडवा शनिवारी सकाळी नष्ट केला.
बोरमपल्ली येथील इंदिरा महिला बचत गटाच्या महिलांनी शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घुले व पोलीस कर्मचाºयांसह दारूविक्रेत्यांच्या घरांवर धाड टाकली. या धाडीत घटनास्थळी दारू काढण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल म्हणजेच साठवून ठेवलेला गुळ व मोहाचा सडवा आढळून आला. महिलांनी सदर सडवा जागीच नष्ट केला. तसेच अन्य दारूविक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून दारू पकडून कारवाई केली. यावेळी इंदिरा महिला बचत गटाच्या महिला अध्यक्ष इंदिरा कोरते, सदस्य श्वेता कोडापे, व्यंकटम्मा नैैताम, मंजूळा कोडापे, यशोदा सडमेक तसेच बचत गटाच्या १५ ते २० महिला उपस्थित होत्या.