मुख्याध्यापकास शिवीगाळ व मारहाण; शिक्षक व विद्यार्थ्यांनी केला निषेध

0
14

अकोला,दि.05 – मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील अर्चना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय लाखपुरी येथे मंगळवारी रसलपूर येथील व्यक्ती लक्ष्मण साबळे यांनी शाळेत प्रवेश करुन मुख्याध्यापकास शिवीगाळ व मारहाण केली. शाळेची रीतसर वेळेनुसार सकाळची  प्रार्थना सुरू होती. नियमानुसार शालेय कामकाज सुरू असतांना लक्ष्मण दौलतराव साबळे यांनी शालेय कामकाजात हस्तक्षेप करण्यास सुरवात केली असता मुख्याध्यापक एस. डी. चव्हाण यांनी कार्यालयात बोलावून विचारलेली माहिती सांगितली, परंतु लक्ष्मणराव साबळे यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर त्यांनी शिक्षक हजेरी पत्रकाची मागणी केली. परंतु मुख्याध्यापकांनी शिक्षक हजेरी पत्रक देण्यास नकार दिला. राग अनावर होऊन झाला साबळेंनी त्यामधील पाने फाडली. त्यामुळे शाब्दिक वाद झाला. यावेळी साबळे यांनी मुख्याध्यापक एस. डी. चव्हाण यांना शिवीगाळ करून मारहाण केली. ही बाब सर्व विद्यार्थी व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समोर घडली. घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून बुधवारी काळ्या फिती लावण्यात आल्या. यावेळी निषेधामध्ये अर्चना विद्यानिकेतन लाखपुरीचे सदस्य प्रकाशसिंह दौलतसिंह चव्हाण, के. एन. राऊत, तसेच अ. शे. देशमुख आणि पालक वर्ग दिपक तामसे, दिनेश भातपुढारे, संजय इंगळे, संदीप इंगळे, गणेश भातपुढारे, धनराज सरदार, घम्मपाल जामनिक, अतुल नवघरे व आकाश जामनिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी काळी फित लावून आणि कामकाज बंद ठेवून सर्वांनी जाहिर निषेध व्यक्त केला.