वीजवितरण कंपनीतील कंत्राटदारची गोळी झाडून घेऊन आत्महत्या

0
15

नांदेड,दि.12-येथील श्रीनगर भागातील शासकीय कंत्राटदार के.सुमोहन मोहनराव (५८) यांनी बुधवारी राहत्या घरात कोणी नसताना पिस्तूलातून गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी सहा वाजता घडली.श्रीनगर भागात सायन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर शासकीय कंत्राटदार के.सुमोहन मोहनराव (५८) हे कनगलाविला या बंगल्यामध्ये राहत होते. वीज वितरण कंपनीत ते वेगवेगळे कंत्राट घ्यायचे. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घरात कोणीही नसताना त्यांनी आपल्या पिस्तूलातून छातीत गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. त्यांचा जाग्यावरच मृत्यू झालाले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

पोलिसांना आत्महत्यास्थळी तीन पानाचे इंग्रजीमधील सुसाईट नोट सापडली आहे. ती पोलिसांनी जप्त केली आहे. आर्थिक व्यवहारातून काही मंडळी त्यांना त्रास देत असल्याने कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. सायंकाळी त्यांची पत्नी हेल्थ क्लबला गेल्यानंतर त्यांनी आपल्या पिस्तूलातून गोळ्या झाडून घेतल्या. बुधवारी लॉकरमधूनच त्यांनी दुपारी पिस्तूल आणून ठेवली होती, अशी माहिती प्राप्त झाली आहे. मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूची मंडळी तेथे जमली. तेंव्हा सुमोहन कनगला हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर भाग्यनगर पोलिसांचे पथक त्याठिकाणी आले. त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे