कंत्राटदार आत्महत्येप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

0
5

नांदेड,दि.13 : येथील महावितरण कंपनीचे काम करणारे शासकीय कंत्राटदार सुमोहन कनगला यांच्या आत्महत्येप्रकरणी चार मोठ्या व्यापाऱ्याविरूद्ध आत्महत्येस परावृत्त केल्या प्रकरणी भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बुधवारी (दि. ११) रात्री आरोपी उद्योगपती चंद्रकांत गव्हाणे यांना अटक केली आहे. विद्यानगर भागात राहणाऱ्या के. सुमोहन यांनी बुधवारी संध्याकाळी परवानाधारक पिस्तुलाने गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, या चिठ्ठीमध्ये चंद्रकांत गव्हाणे यांच्यासह हैद्राबादमधील बाला रेड्डी आणि विनोद रेड्डी तसेच भुवनेश्वर येथील जितेंद्र गुप्ता यांची नावे लिहली होती. या चौघांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी लिहून ठेवले होते.

सुमोहन यांची गव्हाणे, रेड्डी आणि गुप्ता यांच्यासोबत एका कंपनीत तीन कोटी ७५ लाख रुपयाची व्यावसायिक भागीदारी होती. परंतु या तिघांनी पैसे व्यवसायात गुंतवले नाही. तसेच आयसीएम या कंपनीत गुंतवलेले ८० लाख रुपये विनोद रेड्डी यांनी परत केले नाही. तसेच जितेंद्र गुप्ता यांच्याकडून एक कोटी १६ लाख रुपये येणे होते. ते देत नव्हता. यामुळे ते आर्थीक मानसिक त्रासास कंटाळून हे पाऊल उचलले. हे चौघेजण सुमोहन यांना बराच त्रास देत होते. या त्रासामुळे त्यांना आर्थिक नुकसान झाली होती.

नागपूरला जायायचे म्हणून त्यांनी त्यांनी रिव्हॉल्व्हर बँकेच्या लॉकरमधून घरी आणली होती. यावरून त्यांनी आत्महत्या करण्याचं मनाशी निश्चित ठरवलं होतं हे सिद्ध होते अस पोलिसांचं म्हणणं आहे. चिठ्ठीत नाव दिसताच उद्येागपती गव्हाणे यांना पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे यांनी अटक केली. लवकरच बाहेर राज्यात असलेल्या तीघांनाही अटक केली जाण्याची शक्यता आहे. सुमोहन यांनी चिठ्ठीमध्ये जे आरोप केले आहेत ते खरे आहेत की नाही याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांना या चौघांकडून माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. मुरली मोहन कनगला यांच्या फिर्यादीवरुन वरील चार जणांवर गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे हे करीत आहेत.