देशी कट्टयासह गोंदियाचा कुख्यात आरोपी बेला येथे जेरबंद

0
22

मागील एक वर्षापासुन पोलीस घेत होती शोध
अनेक गंभीर गुन्हयांमध्ये आरोपीचा सहभाग

भंडारा,दि.19: गोंदिया जिल्हयातील अनेक गुन्हयात मागील एक वर्षा पासुन फरार असलेला कुख्यात गुंड सहेजाद उर्फ बंदे सब्बीर खान पठाण, वय २५ वर्ष, रा. रेल टोली, पाल चैक, गोंदिया याला पोलीस अधिक्षक भंडारा यांच्या जिल्हा रेड पथकाने भंडारा शहरालगत असलेल्या ग्राम बेला इथुन दिनांक १७ जुलै रोजी रात्री देशी कट्टा व दोन जिवंती काडतुससह अटक केले.
अटक आरोपी हा पोलीस ठाणे गोंदिया शहर, रामनगर, रावणवाडी, गोंदिया ग्रामिण परिसरातीन विविध गुन्हयांमध्ये सहभागी असुन त्याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, अपहरण, खंडणी तसेच मोक्का अशा विविध गंभिर गुन्हयामध्ये फरार असुन तो गनी खान गॅगचा महत्वाचा सदस्य असुन गोंदिया पोलीस त्याचा मागील एक वर्षा पासुन शोध घेत होते.
सहेजाद उर्फ बंदे सब्बीर खान पठाण याचे गोंदिया पोलीसांचे अभिलेखावर महत्वाचा गुन्हेगार म्हणुन नोंद असुन तो मागील एक वर्षा पासुन वेशांतर करून वेगवेगळया ठिकाणी राहत असल्याने पोलीसांना त्याचा शोध घेण्यास अडचण येत होती.
सदर आरोपी भंडारा जिल्हयाच्या हद्दीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांना मिळताच त्यांनी जिल्हा रेड पथकाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. जिल्हा रेड पथाच्या अधिकाºयांनी आरोपी सहेजाद उर्फ बंदे सब्बीर खान पठाण याच्या संदर्भात अधिक माहिती गोळा करण्यास सुरूवात केली.दरम्यान आरोपी हा स्वत:ची ओळख लपवुन बेला येथील ढाब्यावर राहत असल्याची माहिती मिळताच जिल्हा रेड पथक व शिघ्र कृति दलाच्या अधिकाºयांनी सापळा रचुन दि.१७ जुलै रोजी रात्री दरम्यान आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळुन आली. आरोपी विरूध्द भंडारा पोलीसात कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा १९५९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा रेड पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक जितेंद्र आडोळे, स.फौ. अश्विनकुमार मेहर, पो.हवा. रूपचंद जांगळे, पो.ना. प्रदिप डाहारे, विनोद षिवणकर, धिरज पिदुरकर, सचिन गाढवे तसेच अधिकाºयांनी केली.