सौंदडच्या गांधी वार्डात निकृष्ठ रस्ता बांधकाम नागरिकांचा आरोप

0
23

सडक अर्जुनी – दि.19– तालुक्यातील ग्राम पंचायत सौन्दड़ येथील गांधी वॉर्डात सुरु असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांनी काम बंद करुन कामाची गुणवत्ता असेलतरच काम होऊ देणार ही भूमिका घेतली आहे.कंत्राटदाराकडून काम सुरु करण्यात आल्यानंतर गांधी वॉर्डातील नागरिक यशवंत मटाले, धनराज पातोडे, सुनील डोये, आशिष नागपुरे, सुहाग गिरी, शरद इरले आदिंनी कामाची पाहणी केल्यावर काम निकृष्ट होत असल्याचा आरोप केला.परिस्थिती बघून ग्रामसेवकाने बांधकामस्थळी भेट देत कामाची गुणवत्ता चांगली राहिल याची ग्वाही दिली.त्यातच सदर रस्ता बांधकामाचे इस्टिमेट दाखविण्याची मागणी नागरिकांनी केली असता टाळाटाळ करण्यात आली.त्यामुऴे नागरिकांनी काम थांबविले असून ग्रामपंचायत सदस्य हर्ष कुमार मोदी यांनी कामाची गुणवत्ता राहील याची ग्वाही दिली आहे.