मराविमचा टेक्नीशियन गोंदियात तर वर्धेत कनिष्ठ लिपिक जाळ्यात

0
14

गोंदिया,दि.०१ः-गोंदिया तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या दासगाव उपविभागातंर्गत येत असलेला टेक्नीशियन छनेंद्र नुकचंद पटले याला २ हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज बुधवारला(दि.०१)रंगेहाथ पकडले.तक्रारदाराच्या घरातील सर्विस लाईनजवळ बसविलेला विद्युत बोर्ड अवैध असून तुमच्यावर विजचोरीचा गुन्हा दाखल होईल असे सांगत तक्रारदारास कार्यवाही न करण्याकरीता ५ हजाराची मागणी केली.तक्रारदारास ही रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने लाईनमेन पटले विरुध्द २९ जुर्ले रोजी गोंदियातील लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली.त्या तक्रारीच्या आधारे पडताळणी केल्यानंतर आज १ ऑगस्ट रोजी तक्रारदाराच्या घरी टेक्नीशियन पटलेस लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन तडजोडीअंती २ हजाराची लाच घेतांना पकडले.ही कारवाई पोलीस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक दिलीप वाढणखर,भदाडे,राजेश शेंद्रे,प्रदिप तुळशकर,रंजीत बिसेन,नितिन रहागंडाले,गिता खोब्रागडे,देवानंद मारबेत आदीनी केली.

वर्धा : आष्टी तालुक्‍यातील दुय्यम उपनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीच्या दुय्यम प्रतीची झेरॉक्‍स देण्याकरिता 250 रुपयांची लाच स्वीकारणारा कनिष्ठ लिपिक प्रल्हाद गोबरा राठोड याला मंगळवारला अटक केली. फिर्यादीच्या वडिलांनी दुय्यम उपनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणी केली होती. या नोंदणीची झेरॉक्‍स प्रत प्राप्त करण्याकरिता फिर्यादी कार्यालयात गेले असता त्यांना कनिष्ठ लिपीक प्रल्हाद राठोड याने 400 रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 250 रुपयांत झेरॉक्‍स देण्याचे ठरले होते. तक्रारीनुसार आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लिपीक राठोडला अटक केली.