वनजमिनीवर अतिक्र मण;११ जणांना अटक

0
9

भंडारा,दि.२३=वनजमिनीवर अतिक्रमण करून वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्‍या ११ जणांना कारधा पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बोरगाव (बुज.) जंगल शिवारात मंगळवारी २ वाजताच्या सुमारास घडली.
आदिवासी संघटनेचा गणवेश धारण करून सैनिक असल्याचे भासवून जंगल शिवारात दशहत पसरवित आरोपींनी वनसंपदेचे नुकसान केले आहे.
आसाराम वैद्य (६५), पंकज आसाराम वैद्य (२५) दोन्ही रा. मेंढा, हेमकृष्ण तेजराम उईके (३६) रा. कुंभली, केवळराम गुजर उईके (६७) रा. पिटेझरी, वसंत बळीराम इळपाते (६१) रा. उकारा, जैलाल बळीराम नामुर्ते (३0) रा. एकोडी, दलिराम सदाशिव उईके (३६) रा. रावनवाडी, चैतराम किसन टेका (३६) रा. पिटझरी, केशव शामराव मेर्शाम (२८) रा. मकरधोकडा, सेवकराम डुकरू टेकाम (४७) रा. पिटेझरी, रेवन सुरेश वरखडे (५५) रा. पिटेझरी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींनी बोरगाव (बुज.) शिवारातील एक हेक्टर जागेत लागवड करण्यात आलेल्या ११ हजार १११ वृक्षापैकी ५५५ वृक्ष ट्रॅक्टर क्र. एमएच४0/एल ६४९८ च्या सहाय्याने नष्ट केले. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी निलय सुरेश भोगे (४२) हे कर्तव्यावर असताना त्यांच्या अंगावर धावून वन, जल, जमीन हमारी है, उस पर हमाला अधिकार है, अशा घोषणा देत वनाधिकारी व कर्मचार्‍यांना मारण्याची धमकी दिली. आरोपींनी सुमारे अर्धा हेक्टर जागेत अतिक्र मण केले होते. तक्रारीवरून कारधा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार मुटकुरे करीत आहेत.