23.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home गुन्हेवार्ता अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आर्णीत कडकडीत बंद

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आर्णीत कडकडीत बंद

0
28
आर्णीतील एका १४ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध देऊन आरोपींनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले होते. याबाबत कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी सुद्धा पीडित मुलीला देण्यात आली होती. या भीतीपोटी गेल्या सहा महिन्यांपासून पीडित मुलगी या नराधमांचा अत्याचार सहन करत होती. शेवटी गुरुवारी पीडितेने सर्व प्रकारची माहिती आपल्या वडिलांना दिली. त्यानुसार मुलीच्या वडिलांनी आर्णी पोलीस ठाण्यात मुस्तफा जब्बार (वय २२ रा.मूबारक नगर आर्णी) सोहेल शेख, शेख साजीद (वय २२ रा.मूबारक नगर आर्णी) या आरोपींविरुद्ध मुलीवर अतिप्रसंग, लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार आर्णी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी आरोपीं विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
मुस्तफा जब्बार या आरोपीला दिग्रस येथून तर शेख सोहेल याला आर्णी येथून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. आर्णी शहरात मागील काही दिवसांपासून महिला तरुणींवरील छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी आणि आरोपींवर योग्य कारवाई करण्यात यावी यासाठी गुरुवारी सर्वपक्षीय आणि नागरिकांकडून आर्णी बंदची हाक देण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ आर्णी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.
blank