चंद्रपूर जिल्हा कारागृह अधीक्षकाला लाच घेताना अटक

0
13
वॅलेंटाईन पुजारा या व्यक्तीने कोळशाच्या बिलापोटी एका व्यक्तीला धनादेशाच्या स्वरुपात रक्कम अदा केली होती. परंतु हे धनादेश बाऊन्स झाले. या प्रकरणी पुजारा याला न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली. चंद्रपूर कारागृहात तो शिक्षा भोगत असताना त्याची मुदतपूर्व सुटका झाली. पुजाराला समन्स बजवण्यासाठी तक्रारदाराने चंद्रपूरमधल्या कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांच्याकडे पुजाराची कागदपत्रे व पत्ता मागितला. ढोले यांनी कागदपत्रांच्या बदल्यात २५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र तडजोडीनंतर १५ हजारावर बाब पक्की करण्यात आली.त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे धाव घेत ढोले विरूद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर लाचलुचपत खात्याने सापळा रचून १५ हजारांची लाच स्विकारताना ढोले यांना रंगेहात पकडले.