लाईनमनला लाच घेतांना अटक

0
8

गोंदिया, दि. २२ : कापलेले विद्युत कनेक्शन पुन्हा जोडून देण्याकरिता साडेतीन हजारांची लाच ंागणाèया लाइनमला रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (ता. २२) सकाळी साडेअकराच्या सुमारास तिरोडा तालुक्याच्या सुकळी येथे करण्यात आली. शैलेंद्रकुमार संपत पटले (वय ३३) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
यातील तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांच्या घरातील विद्युत मिटरचे कनेक्शन लाइनमन पटले याने कापले होते. हे कनेक्शन पुन्हा जोडून देण्याची विनंती तक्रारदाराने पटले यांना केली. या वेळी पटलेने ४ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती साडेतीन हजार रुपये देण्याचे ठरले. परंतु, लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने २१ ऑक्टोबरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पथकाने सो‘वारी सुकळी येथे सापळा रचला. या वेळी पटले याला साडेतीन हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी तिरोडा पोलिसांत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.