26.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ जिल्ह्यातील सर्व केशरी कार्ड धारकांना मिळणार रेशन 

जिल्ह्यातील सर्व केशरी कार्ड धारकांना मिळणार रेशन 

0
34
भाजपच्या शिष्टमंडळाला मंत्री बापट यांचे आश्वासन
गोंदिया,दि.23 – अन्न सुरक्षा योजनेतंर्गत सर्व केशरी कार्ड धारकांना रेशन पुरवठा करण्यात यावा, या प्रमुख मागणीला घेवून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल यांनी अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची भेट घेतली. चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की, गोंदिया जिल्हा हा आदिवासी व नक्षलग्रस्त असून आजघडीला  जिल्ह्यातील ६ लाख ४६ हजार केशरी कार्ड धारक लोकसंख्येला रेशन पुरवठा होतो. मात्र उर्वरित ३ लाख ९९ हजार केशरी कार्ड धारक लोकसंख्या अद्यापही रेशन पुरवठ्याच्या प्रतिक्षेत आहे.  त्यामुळे या गरजू कुटुंबांना त्वरित रेशन पुरवठा सुरू करण्याची मागणी निवेदनातून केली. यावर ना.बापट यांनी केशरी रेशन कार्ड धारकांना ज्यांना रेशन मिळत नाही. त्यांनी वार्षिक उत्पन्नाचे दाखले त्वरित सादर करून अर्ज करावे, सर्वांना रेशन देण्यात येईल, असे आश्वासन देवून तशा सुचना जिल्हा पुुरवठा अधिकारी सवई यांना केल्या.
राज्याचे अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट हे गोंदिया जिल्ह्याच्या दौºयावर आले असता भाजपचे प्रदेश कार्यकरिणी सदस्य विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यात रेशनच्या मुद्द्यासह धानखरेदी केंद्रावर शेतकºयांची होणारी पिळवणूक थांबवून इलेक्ट्रानिक काट्याने धानखरेदी करण्यात यावी, प्रत्येक पंचायत समिती क्षेत्र निहाय धानखरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, नविन धानखरेदी केंद्र उघडण्याची संस्थाना मंजूरी द्यावी, केरोसीन कोट्यात वाढ करण्यात यावी, शासन निर्णय नसताना सुध्दा गोंदिया तालुक्यात अतिरिक्त रेशन पुरवठ्याचे कार्ड धारकांकडून भरविण्यात येणाºया हमीपत्रासोबत तलाठ्याची उत्पन्न दाखल्याची सक्ती बंद करण्यात यावी, आदि विविध मागण्यांंवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील ६ लाख ४६ हजार लोकसंख्येला रेशन वाटप केला जातो. मात्र उर्वरित ३ लाख ९९ हजार केशरी कार्ड धारक लोकसंख्येला रेशन मिळत नसल्याने त्यांनाही रेशन सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली. यावर अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी ज्या केशरी रेशन कार्ड धारकांना रेशन मिळत नाही. त्यांनी वार्षिक उत्पन्नाचे दाखला सादर करावे, शहरी भागातील कुटुंबासाठी वार्षीक उत्पन्न मर्यादा ५९ हजार तर ग्रामीण भागाकरीता ४४ हजार असावे. स्वत:च्या स्वाक्षरीनिशी अर्ज करावे, अर्जाची दखल घेवून त्यांना त्वरित रेशन सुरू करण्यात येणार, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच यासाठी तलाठ्याच्या उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे केशरी कार्ड धारकांना रेशन मिळण्याचा मार्ग मोकळा झााला आहे.
यावेळी शिष्टमंडळात माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, जि.प.सभापती शैलजा सोनवाने, भाजप जिल्हामंत्री भाऊराव उके, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, न.प.सभापती दिपक बोबडे, मुनेश रहांगडाले, परसराम हुमे, कमलेश सोनवाने, मेहतर पगरवार, सुभाष डहाटकर, कुंजन रहांगडाले, तेजराम गौतम, बाबा बिसेन, गोल्डी गावंडे, अजाबराव रिनायत आदि उपस्थित होते.