26.9 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home गुन्हेवार्ता चंद्रपुरात आजीसह नातीची हत्या

चंद्रपुरात आजीसह नातीची हत्या

0
21
सुशीला पिंपळकर (वय ५२) आणि श्वेता राजपूत (वय ७) अशी मृतांची नावे आहेत. बालाजी परिसरात त्यांची हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा दोघे फरशीवर मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी घरात तपासणी केली असता घरात काही ठिकाणी आरोपींनी जाळपोळ करून पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. या दुहेरी खून प्रकरणात ओळखीची व्यक्ती सामील असल्याची दाट शक्यता असल्याने पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. हत्येचे कारण अद्यापही समजू शकले नसले तरी प्रेमप्रकरणातून ही घटना झाल्याची प्राथमिक चर्चा आहे.