२ नोव्हेंबरला शाळांचा राज्यव्यापी आंदोलन

0
12

नागपूर,दि.24ः-महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाच्या वतीने खाजगी शाळांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात २ नोव्हेंबरला एक दिवसीय शाळा बंद आंदोलन करण्यात येत आहे. यासंबंधाने नागपूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा चालविण्यार्‍या संचालकांची व नागपूर विभागातील सर्व जिल्ह्याच्या पदाधिक ार्‍यांची सभा उद्या २५ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता सेवासदन हायस्कू ल, सीताबर्डी येथे घेण्यात येणार आहे., अशी माहिती राज्य महामंडळाचे सरकार्यवाह रविंद्र फ डणीस यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
शासनाला खाजगी शिक्षण संस्थांचा विसर पडला असून शासनाच्या अशैक्षणिक धोरणामुळे खाजगी शिक्षण संस्था व कार्यरत शिक्षकांना आर्थिक प्रशासकीय तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर वाईट परिणाम झालेला दिसत आहे.
त्यामुळे सरकारने शिक्षणावरील खर्च हा बोजा न समजता, ही शिक्षणावरील गुंतवणूक समजून खर्च वाढवावा, औरंगाबाद येथील शिक्षकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, २0 टक्के अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान द्यावा, अघोषित शाळा, वर्ग-तुकड्या व महाविद्यालयांना तत्काळ निधीसह अनुदान घोषित करावे, २00५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, मालमत्ता कर व विज बिलात सूट मिळावी, शिक्षण संस्था चालकांच्या जिल्हा संघटनेसोबत समन्वय बैठका घ्याव्यात असे लेखी आदेश असूनही जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फ त बैठका न घेतल्याने समस्या वाढतच गेल्या. इत्यादी सर्व मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे शाळा बंद आंदोलन करण्यात येत आहे असे रविंद्र फ डणवीस यांनी यावेळी सांगितले.
यानंतर देखील सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास बेमुदत बंद शाळा आंदोलन पुकारण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाच्या वतीने फ डणवीस यांनी दिला. यावेळी महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद गुडधे पाटील, सचिव किशोर मासुरकर, प्रशांत पाहुणे उपस्थित होते.