नांदेड जिल्ह्यातील टिनपत्रे कापून चोरी करणारी गॅंग गजाआड

0
16

नांदेड,दि.२६ः- गेल्या चार महिन्यात मराठवाडासह नांदेड शहर व जिल्ह्यात दुकानाचे टिनपत्रे कापून मोठा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने आत्तापर्यंत ५० दुकानांचे टिनाचे पत्रे कापून चोऱ्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या चोऱ्यांच्या सत्रामुळे व्यापारी हैराण झाले होते, त्यांनी पोलिसांना याबाबत निवेदनही दिलं होतं. वजिराबाद भाग, मुदखेड, इतवारा या भागातील चोऱ्या  कशा झाल्या याची पाहणी करत असताना पोलिसांना कळालं की या सगळ्या चोऱ्या एकाच पद्धतीने करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या चोऱ्यांबाबत नांदेड परिक्षेत्रामध्ये लातूर, परभणी व हिंगोली येथे संशयास्पद हालचाली दिसल्यास ताबडतोब माहिती द्यावी असे संदेश धाडले होते. यानंतर लातूर शहरातील लातूर अर्बन को.ऑप.बँकेच्या काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करतानाची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या तीनही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दुकानांमध्ये केलेल्या चोऱ्यांची कबुली दिल्या श्रीनिवास कर्पे (वय-२२), सय्यद याकूब (वय-३१ वर्षे) , शेख फारूख शेख  अशी या आरोपींची नावे आहेत. यासाठी जिल्हा पुलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निकाळजे यांच्या नेत्रवाखाली पोलिसांनी कामगिरी पार पाडली . सध्या सणासुदीच्या दिवस असल्या कारणाने व चोऱ्याच्या भीतीने हैराण व्यापारी या अटकेमुळे व्यापर्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या तरी या पोलिसांच्या कमगिरीमुळे नांदेड पुलीसचे कौतुक होत आहे.