तुमसरच्या व्यापार्याच्या गाडीतून चोरट्याने केली कोटीची रक्कम लंपास

0
6

गोंदिया,दि.01ः- तुमसर येथील सोनी ज्वेलर्सचे मालक हे व्यवसायिक कामासाठी तुमसरवरुन आपल्या एमएच 36 पासींग चारचाकी वाहनाने गोंदियाला येत असतांना त्यांच्या मागावर असलेल्या सराईत चोरट्यांनी त्यांच्या वाहनातील बगमध्ये असलेली सुमारे 1 कोटी रुपयाची रक्कम व साहित्य लंपास केल्याची घटना बुधवारच्या रात्री 10 वाजेच्या सुमारास गायत्रीमंदीर चौक परिसरात घडली.सोनी हे रात्रीला कुडवा नाकापरिसरातील एका हाॅटेलसमोर थांबले आणि जेवणासाठी गेले.जेवण करुन अवघ्या 10 ते 15 मिनिटात गाडीजवळ येताच त्यांना त्यांच्या गाडीतील रक्कम असलेली बग गहाळ झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.रात्री वाजेपासून रामनगरचे ठाणेदार जितेंद्र बोरकर व त्यांची चमू या तपासात लागली आहे.त्यातच तुमसरपासून गोंदियापर्यंत त्यांच्या मागावर कुणी होते का याचाही तपास घेतला जात आहे.गोंदिया,तुमसर व तिरोडा येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनीही या प्रकरणात तपास कार्य सुरु केले आहे.