भोंदूबाबाकडून शारीरिक सुखाची मागणी

0
10

नागपूर,दि.02 : पिलीया आजारावर अंगारा-धुपारा घेण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय विवाहितेला 63 वर्षीय भोंदूबाबाने शारीरिक सुखाची मागणी केली. त्यामुळे पती-पत्नीने भोंदूबाबाची धुपाटण्यानेच धुलाई करीत चांगला प्रसाद दिला. ही घटना तहसील हद्‌दीत आज उघडकीस आली. अजीजो रहेमान हाफीज अब्दूल गफूर (रा. अन्सारी मश्‍जिदजवळ, मोमीनपुरा) असे भोंदूबाबाचे नाव आहे. अजीजो रहमान हा भोंदूबाबा असून तो पिलीयासह अन्य शेकडो आजार अंगारा-धुपारा देऊन बरा करण्याचा दावा करतो. त्यामुळे त्याच्याकडे अनेक अंधश्रद्धाळूंची मोठी गर्दी असते. पिलीयाचा इलाज करण्यासाठी मोमीनपुऱ्यात राहणारी 22 वर्षीय विवाहित महिला त्याच्याकडे गेली. त्याने दोन दिवस तिच्या पतीला बाहेर ठेवून अंगाराधुपारा दिला. तिसऱ्या दिवशी म्हणज आज गुरूवारी तिला पुन्हा बोलावले. पतीला बाहेर बसण्यास सांगितले. दरम्यान, त्याने अंगारा लावताना तिच्याशी अश्‍लिल चाळे करीत शारीरिक सुखाची मागणी केली. या मागणीमुळे संतापलेल्या महिलेने पतीला प्रकार सांगितला. त्यानंतर त्या पती-पत्नीने भोंदूबाबाला चांगला चोप दिला. त्यानंतर दाम्पत्यांनी तहसील ठाण्यात भोंदूबाबाविरूद्ध तक्रार दिली.