विवाहितेवर कारमध्ये बलात्कार प्रॉपर्टी डिलरवर गुन्हा दाखल

0
6

नागपूर,दि.02 : एका प्रॉपर्टी डिलरने एका विवाहित महिलेला मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन कारमध्ये कोंबून बलात्कार केला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मदफारूख शेख हमीद शेख (वय 35, रा. अग्रेसन चौक, गांधीबाग) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित 28 वर्षीय महिला सानिका (बदललेले नाव) ही कामठी येथील रहिवासी आहे. तिचा पती भारतीय सैन्य दलात असून तो सध्या जम्मू-काश्‍मिर येथे तैनात आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना भूखंड विकत घ्यायचा होता. त्यामुळे सानिका आणि पतीने फारूख या प्रॉपर्टी डीलरशी संपर्क साधला. प्लॉट विक्री-खरेदीच्या संबंधाने फारूखचे घरी येणे-जाणे वाढले. काहीदिवसांपूर्वीच प्लॉटची खरेदी झाली. त्यानंतर पती पुन्हा ड्युटीवर निघूनगेले असता फारूखने ओळखीचा फायदा घेऊन सानिकाच्या घरी येणे सुरू केले. काही ना काही काम काढून तो घरी येऊ लागला. 1 ऑक्‍टोबरला दुपारी बारा वाजता फारूखने सानिकाला फोन केला आणि कामठी नाका नंबर दोन येथे भेटायला बोलावले. प्लाटचे काम असल्याचे वाटल्याने ती लगबगीने पोहचली. पोहचताच त्याने कारमध्ये बसायला सांगितले. जंगलात कार थांबवून शारीरिक सुखाची मागणी केली. तिने नकार दिला असता फारूखने बळजबरीने कारमध्ये कोंबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोन दिवसानंतर तिला रामटेकला जायचे असल्याचे सांगून कारने घेऊन गेला. तेथील एका लॉजवर तिला मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. त्यानंतर तो तिला बदनामी करण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता. शेवटी त्याच्या अत्याचाराला कंटाळून तिने घडलेला प्रकार पतीला सांगितला. पतीने पोलिसांततक्रार करण्याचा सल्ला दिली. सानिकाने जरीपटका पोलिस ठाण्यात फारूख विरूद्ध तक्रार दिली.