ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार मातेचा मृत्यू

0
12

गोंदिया दि.५ ;दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत सोनी/पोलटोला परिसरातील रस्त्यावर ट्रॅक्टरच्या आरोपी चालकाने निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार मातेचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॉलीचे चाक दीड वर्षीय चिमुकल्याचे पायावरून गेल्याने दोन्ही पाय मोडले. ही घटना आज (दि.४) दुपारची आहे. सुनिता कटरे (२२) रा.सोनी मृतपावलेल्या विवाहितेचे नाव असून घडलेल्या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
सोनी/पोलटोला येथील सुनीता कटरे तालुक्यातील सिरपूर येथे माहेरी दीड वर्षीय चिमुकल्यासोबत भेटीसाठी आली होती. मात्र, आज सकाळी सासुरवाडीला दुचाकीने परत जात असताना सोनी/पोलटोला रस्त्यावरील वळणावर ट्रॅक्टर क्र.एमएच.३५/जी.८७४२ व ट्रॉली क्र.एमएच.३५/एफ.७८८ चा चालक शुभम नटवरलाल जैतवार याने निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जबर धडक दिल्याने सुनिताच्या डोक्यावर गंभीर दुखापत आल्याने तिचा मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक चिमुकल्याच्या पायावरून गेल्याने दोन्ही पाय मोडून गंभीर जखमी झाला. उपचाराकरिता चिमुकल्याला ग्रामस्थांनी गंभीर जखमी अवस्थेत शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. दवनीवाडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. दिवाळी सणापूर्वी विवाहितेचा अपघाती अचानक मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. घटनेचा र्मग दवनीवाडा ठाण्यात दाखल करण्यात आला आहे