अपघातात युवती ठार, युवक गंभीर

0
9

गोंदिया,दि.१० : गोरेगाव-गोंदिया मार्गावरील कारंजा हरिओम कॉलोनीच्या समोर मोटारसायकल अपघातात युवतीचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.२० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. तर या घटनेत मोटारसायकल चालकही गंभीर जखमी झाला आहे. मृतक युवतीचे नाव सुष्मा दिलीप वºहाडे (२२) असून ती पाऊलदौना ता. आमगाव येथील आहे. तसेच जखमी युवकाचे नाव दुर्गेश नान्हे (२७) असे आहे. तो गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील असल्याचे माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच १०८ अ‍ॅम्बुलन्सने मृतक व जखमी युवकाला गोंदिया मेडीकल कॉलेज येथे उपचारासाठी आणण्यात आले आहे.