गळफास घेऊन युवतीची आत्महत्या

0
10

लाखांदूर,दि.११ःः- गळफास घेऊन युवतीने आत्महत्या केल्याची घटना कुडेगाव येथे शनिवारी (दि.१0) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. शारदा पिसाराम बावनकुळे (२१) असे मृत युवतीचे नाव आहे. मृत शारदाच्या आईचा दहा वर्षांपुर्वी मृत्यू झाल्याने ती वडील पिसाराम व मोठा भाऊ राहुल सोबत राहत होती. तिच्या दोन मोठय़ा बहिणींचे लग्न झाल्याने त्या सासरी राहतात. घरची परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने शारदाने अध्र्यावरच शिक्षण सोडले होते. तर वडील व भाऊ हे मोलमजूरी करून उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे दोघेही कामाला केल्यानंतर शारदा एकटीच घरी होती. दुपारच्या सुमारास राहुल जेवनासाठी घरी आला असता शारदा ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली.
सदर प्रकार पाहून आरडाओरड केल्यानंतर शेजार्‍यांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिस स्टेशनचे बिट जमादार तलमले व पोलीस नायक वैरागडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मृतदेह लाखांदूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडीत असल्याने शवविच्छेदन होणार नसल्याचे डॉ. सुनिल रंगारी यांनी सांगितले. लाखांदूर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.