वाघाच्या हल्ल्यात पावनपार येथील महिला ठार

0
8
घटनेची माहिती मिळताच वनविभागाला पाचारण करण्यात आले. वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, या मागणीसाठी गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेरले होते. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. परिस्थिती चिघळू नये, याकरिता पोलिसांना बोलविण्यात आले. घटनास्थळी माजी आमदार अतुल देशकर, प्रभाकर सेलोकर यांनी भेट दिली असता गावकऱ्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला. वाघाचा बंदोबस्त करा नंतरच प्रेत उचणार, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.
माजी आमदार अतुल देशकर यांनी ब्रम्हपुरीचे सहाय्यक वनसंरक्षक बोन्गाले यांना वाघाचा बंदोबस्त तातडीने करुन नागरिकांना संरक्षण देण्याची मागणी केली. मृतकाच्या कुटुंबियांना वनविभागाने तातडीने २५ हजार रुपयांची मदत दिली. मृत महिलेचा मृतदेह नातेवाईक आल्यावर शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला. वातावरण चिघळू नये, म्हणून ठाणेदार दीपक खोब्रागडे, मेंडकी चौकीचे पोलीस उपनिरीक्षक खेडीकर यांच्या उपस्थितीत बंदोबस्त करण्यात आला होता.