गोंडवाना विद्यापीठात ‘जादूटोणा विरोधी कायदा’

0
17

गडचिरोली,दि.19ऋृ अखिल भारतीय अंधर्शध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नाने राज्यात लागू झालेला क्रांतीकारी स्वरूपाचा जादूटोणा विरोधी कायदा गोंडवाना विद्यापीठाच्या विधी व समाजशास्त्र विभागाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याचा ठराव नुकताच विद्यापीठाच्या अधिसभेने सर्वानुमते पारित करून विद्यापिठाच्या अँकॅडमिक कौन्सिलकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत सिनेट सदस्य, अ.भा. अंधर्शध्दा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष तथा नियोजन व अंमलबजावणी मंडळाचे सदस्य अँड. गोंविद भेंडारकर यांनी विद्यपिठाच्या अधिसभेत सदर कायद्याचे महत्व आणि गरज यावर अनेक ज्वलंत प्रश्न आणि उदाहरणांसह अभ्यासपूर्ण मांडणी केली.
तसेच हा कायदा अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्याची मागणी लावून धरली, परिणामी अधिसभेत सवार्नुमते जादूटोणा विरोधी कायदा अभ्यास क्रमात सामाविष्ठ करण्याचा क्रांतीकारी असा निर्णय घेण्यात आला.समाजस्वास्थ्याच्या दृष्टिने अतिशय महत्वपूर्ण अशा सदर निर्णयाबद्दल अँड. गोविंद भेंडारकर यांनी गोंडवाना विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर आणि सर्व सिनेट सदस्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले आहे.