सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाकडून चाकूहल्ला

0
12

नागपूर,दि.15 – सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाने आपल्या साथीदारासह सीताबर्डी परिसरात असलेल्या एका पानठेला चालकावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची माहिती सोमवारी (दि.14) रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली. करण कल्याणसिंग राजपूत असे आरोपीचे नाव असून त्याचे वडील सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक आहेत. सोमवारी रात्री तो आपल्या दहा ते बारा साथीदारासह सीताबर्डी परिसरातील रामदासपेठ येथे असलेल्या पानठेल्यावर गेला. यावेळी कुठल्यातरी कारणाहून त्याचे पानठेला चालकाशी भांडण झाले. यातूनच त्याने पानठेला चालकावर चाकूने हल्ला करीत पळ काढला. विशेष म्हणजे यापूर्वीही करण राजपूत याने अशाच प्रकारे सीताबर्डीतील दुकानदाराला मारहाण केली होती. वृत्त हाती येईपर्यंत करण राजपूत आणि त्याचे साथीदारांना अटक करण्यात पोलिसांना यश आले नव्हते.