26.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home गुन्हेवार्ता विशेष पोलीस पथकाची अवैध धंदयावर धडक कारवाई

विशेष पोलीस पथकाची अवैध धंदयावर धडक कारवाई

0
31

गोंदिया,दि.01- जिल्हयात अवैध धंदे मोठया प्रमाणात फोफावले आहे यावर आळा घालण्यासाठी पोलीस अधिक्षक मंगेश qशदे यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण हद्दीत २८ नोव्हेंबर रोजी ४.२० वाजता दरम्यान पेट्रोलींग करत असतांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून आरोपींना पकडण्यात आले. पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण हद्दीत पोलीस पेट्रोलींग करत असता त्यांना फुलचुर टोला गोंदिया येथे भदाडे तलावाजवळील झुडपी जंगलात जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली असता पोलीसांनी सापळा रचून घटनास्थळावर धाड मारली असता अरोपी विक्रम अनंतराम भेलावे (३४) रा. हिरडामाली, अजय जुगलकिशोर सोनकर रा. शास्त्रीवार्ड गोंदिया, अभिषेक रिंकु बैस (२३) रा. वाजपेयी वार्ड गोंदिया, सलीम शरीफ कुरैशी (५१) रा. वाजपेयीवार्ड गोंदिया, महेश ग्यानीराम नेवारे (२७) रा. वाजपेयी वार्ड हे जुगार खेळताना आढळून आले.

त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडून रोख र्नकम ५ हजार ९९० रूपय, चार नग मोबाईल हॅन्डसेट qक.३९ हजार रू., पाच मोपेड मोटारसायकल qक. २०२००० रू.चटई, ताडपत्री qक. ३०० रू., व ५२ तासपत्ती qक. १०० रू.असा एकूण २६५३९० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरूद्ध पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरी पोलीस अधिक्षक मंगेश qशदे, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक प्रदीप अतुलकर, गोपाल कापगते, मधुकर कृपाण, नरेंद्र फुलबांधे, शिवाजी गुरूनुले, गजानन मारबते, वसिम पठाण, कैलास ठाकरे, मनोज हातझाडे, ओंकार गौतम यांनी पार पाडली.

blank