दोन लाखाची देशी बनावट दारु जप्त

0
303
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.01 – राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी रात्री शहरातील बाजपेई चौक परिसरात केलेल्या कारवाईत २ लाख २१ हजारांची देशी दारू जप्त केली. राज्य उत्पादन शुल्क विभागला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार बाजपाई वॉर्ड येथे धर्मकाटाच्या बाजूला असलेल्या चारचाकीत बनावटी देशी दारू आढळली. याची किंमत २ लाख २१ हजार रुपये असून या मुद्देमालासह पोलिसांनी चारचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे तीन महिन्यापूर्वीच याच परिसरात सुरु असलेल्या एका कारखान्यातून मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा साठा जप्त केला होता.