25.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ कोरोना संसर्ग काळातही अर्जुनी मोरचे नोडल अधिकारी अर्जित रजेवर

कोरोना संसर्ग काळातही अर्जुनी मोरचे नोडल अधिकारी अर्जित रजेवर

0
672

अर्जुनी-मोर,दि.26ःदेशात सर्वत्र कोरोना विषाणूंचा संसर्ग सुरू आहे या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून कोरोना केअर सेंटर तयार केले आहेत.त्याचप्रमाणे अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.मात्र अर्जुनी-मोर तालुक्यातील एरंडी येथील काळजी केंद्राचे नोडल अधिकारी तसेच अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अकिनवार हे अर्जित रजेवर गेल्याने नोडल अधिकारीच रजेवर म्हणण्याची वेळ आली आहे.
देशात कोरोणाचा प्रादुर्भाव सुरू आहे त्याचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहेत संपूर्ण यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे आहे.तर दुसरीकडे अशी अत्यावश्यक सेवा बजावणारे आपल्या कर्तव्यापासून दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे. अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अकिनवार हे देशात लॉकडाउन झाल्यानंतरही यापूर्वी आपल्या कर्तव्याला चुकले होते.तालुका प्रशासनानेबी बाब जिल्हाधिकार्‍यांना कळविली होती.आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनीसुद्धा त्यांची तक्रार आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. मात्र या अधीक्षकांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळे या वैद्यकीय अधीक्षकांचे मनोबल अधिकच उंचावल्याचे बोलले जात आहे.
ग्रामीण रुग्णालययांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा तर पांगळीच झाल्यासारखी आहे त्यांना जनतेच्या आरोग्याची सोयरसुतक असल्याचे दिसत नाही.या वैद्यकीय अधीक्षकांची ही पहिलीच तक्रार नाही असे येथे अनेकदा प्रकार घडत आहेत. मात्र आपले कामाचे तीस दिवस पूर्ण झाले की पगार मिळतोच अशी मनोवृत्ती ठेवणाऱ्या आरोग्य यंत्रणेचे काही अधिकारी भ्रमणध्वनीला साधा प्रतिसादही देत नाही.सध्या सर्वत्र जिल्हा सीमाबंदी आहे असे असताना डॉक्टर मुख्यालय सोडून नागपूरला गेले.कोरोणाच्या बाबतीत नागपूर सध्या संवेदनशील आहे बाहेरून गावात येणाऱ्या सामान्य इसमाला क्वारंटाइन केंद्रात ठेवले जाते.हे डॉक्टर एकदा याच पद्धतीने नागपूर वरून येथे आले ते स्वतः डॉक्टर आहेत त्यांना हे सर्व समजते मग ते क्वारंटाइन का झाले नाही. सामान्यांसाठी वेगळा नियम व कर्मचाऱ्यांसाठी वेगळा नियम तर नाही ना असा भास या कृतीवरून होत आहे.
नागपुर वरून आल्यानंतरही त्यांनी प्रशासनाला कळविले नाही ही शासन निर्देशाची पायमल्ली नाही काय याप्रकरणी प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली पाहिजे.ते रजेवरून परत येतील तेव्हा सुद्धा त्यांना क्वारंटाइन करून सर्वांसाठी एक सारखेच नियम आहेत. हे दाखवून देण्याचे धाडस जिल्हा प्रशासन करेल काय हा प्रश्न चर्चिला जात आहे. शुक्रवार 24 एप्रिलला उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी डॉ.अकिनवार हे मुख्यालय सोडण्याची परवानगी नसताना अर्जित रजेवर गेल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचे समजते यासंदर्भात काय कारवाई होते याकडे अर्जुनी-मोर तालुका वासियांचे लक्ष लागून आहे.

blank