28.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home गुन्हेवार्ता जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल

0
611

अर्जुनी मोरगाव,दि.26ः तालुक्यातील झरपडा यथील उपसरपंचाने जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ करून मारपीट केल्याप्रकरणी  झरपडा येथील अशोक पैका बोरकर यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे.
8 एप्रिल रोजी कोरोना विषाणू संबंधाने औषध फवारणी दरम्यान चार-पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये. गावात शांतता राहावी बांधकाम तसेच ट्रॅक्टरद्वारे हमाल देऊन काम करू नये अशी गावात दवंडी देण्यात आली.तरीही आरोपी अशोक बोरकर यांनी 9 एप्रिल रोजी विटा विक्री करून गावातीलच किसन दहिवले यांच्या घरी नेऊन टाकल्याची बाब लक्षात आल्यावर ग्रामपंचायत सदस्य नरेश राऊत यांनी समजावून सांगितले.त्यानंतर चार-पाच हमालांना सोबत घेऊन ग्रामपंचायत सदस्य नारद शहरे यांच्या शेताकडे जाऊन उपसरपंच विश्वनाथ खोबरागडे हे जमावबंदी व संचारबंदी संबंधाने गावात हजर असताना आरोपीने ग्रामपंचायत सदस्य शहारे यांच्या भ्रमणध्वनीवरून कॉल करून बोलाविले असता  गेल्यावर बोरकर यांनी ट्रॅक्टरवरून उतरत शिवीगाळ व मारपीट केल्‍याची तक्रार उपसरपंच विश्वनाथ खोब्रागडे यांनी अर्जुनी-मोर पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले करीत असून आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच मारपीट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.