28.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ अर्णव गोस्वामीला तात्काळ अटक करा काँग्रेसचे निवेदन

अर्णव गोस्वामीला तात्काळ अटक करा काँग्रेसचे निवेदन

0
574

गोंदिया,दि.26: पालघर जिल्ह्यात दोन साधुंसह तिघांच्या झालेल्या हत्येप्रकरणी वृत्तवाहिनीच्या चॅनलवर सुरु असलेल्या चर्चेत अर्णव गोस्वामी याने काँग्रेस पक्ष व पक्षाच्या अध्यक्षा खा.सोनिया गांधी यांच्या बद्दल गलीच्छ भाषेत बोलून जाती-जातीत तेढ निर्माण होईल, असे शब्द वापरले. या घटनेचा जिल्हा युवक काँग्रेस व एनएसएयुआच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला असून अर्णव गोस्वामी यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आलोक मोहंती, एनएसयुआचे जिल्हाध्यक्ष हरीष तुळसकर यांनी केली आहे. या संदर्भात रामनगरचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, काँग्रेस पक्ष नेहमी सर्वधर्मिय एकतेवर चालणारा पक्ष आहे. हिंदु, मुस्लीम व ख्रिश्चन या धर्मात जातिय भांडण लावण्याचे काम गोस्वामी करीत आहे. साधु संत महाराष्ट्राची परंपरा असून काँग्रेस पक्षाने नेहमी त्यांचा सन्मान केला आहे. साधूंना मारण्याचा हा पुर्वनियोजित कट दिसत असून या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी. मात्र साधुंसह तिघांच्या झालेल्या हत्येप्रकरणी वृत्तवाहिनीच्या चॅनलवर सुरु असलेल्या चर्चेत अर्णव गोस्वामी याने काँग्रेस पक्ष व पक्षाच्या अध्यक्षा खा.सोनिया गांधी यांच्या बद्दल गलीच्छ भाषेत बोलून जाती-जातीत तेढ निर्माण होईल, असे शब्द वापरले. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवित काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी रोष व्यक्त केला आहे. अर्णव गोस्वामी यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी अशी मागणीही निवेदनातून केली आहे. यावेळी निवेदन देताना काँग्रेसचे प्रदेश सचिव अमर वर्‍हाडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आलोक मोहंती, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर, जहिरभाई, अमर, राहुल आदिंसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.