26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home गुन्हेवार्ता केटीएसच्या वार्ड क्रं.5मधील रुग्णाच्या नातेवाईकाची डाॅक्टरला धक्काबुक्की

केटीएसच्या वार्ड क्रं.5मधील रुग्णाच्या नातेवाईकाची डाॅक्टरला धक्काबुक्की

0
1493

गोंदिया,दि.07ः-शासकीय रुग्णालय असो की खासगी रुग्णालय यामध्ये कार्यरत असलेल्या डाॅक्टरांना शिविगाळ करणे,मारहाण करणे कायद्याने दखलपात्र गुन्हा ठरविला गेला आहे.मात्र याला न जुमानताही काही रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयातील कर्मचारी व डाॅक्टरांशी हुज्जत घालणे मात्र बंद करतांना दिसून येत नाही.त्यातच झाले असे की,गोंदिया जिल्हा कुवरतिलंकसिंह सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वार्ड क्रमांक 5 मध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने डाॅ.भुषण नामक वैद्यकिय अधिकार्याला कर्तव्य बजावत असतांना धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारला दुपारच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे.सदर वैद्यकीय अधिकारी हे दुपारच्यावेळी वार्डांत तपासणी करीता गेले असतांना वाँर्डातील सर्वांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले.त्यादरम्यान एका रुग्णाच्या नातेवाईकांने बाहेर जाण्यावरुन वाद घालत संबधित डाॅक्टरलाच धक्काबुकी केल्याने काहीवेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती सुत्रानी दिली.त्यानंतर सदर प्रकरण पोलिसाना कळविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.