23.9 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home गुन्हेवार्ता पांजरा येथे तलाठी शहारे व थुलकरवर वाळुमाफियांचा हल्ला,एकाला अटक

पांजरा येथे तलाठी शहारे व थुलकरवर वाळुमाफियांचा हल्ला,एकाला अटक

0
999
घटनेनंतर रावणवाडी पोलीस ठाणेसमोर एकत्र आलेले तलाठी

गोंदिया,दि.13ः-दिवसेंदिवस वाळूमाफियांची दहशत वाढतच चालली असून त्यांच्या मनात पोलीस प्रशासनाची व कायद्याची भितीच उरली नसल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे.त्याचे असे की आज शनिवारला 13 जून रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने लिलाव झालेला वाळू साठा ताब्यात घेण्यासाठी गेलेले तलाठी सुनिल शहारे व थुलकर यांच्यावर तालुक्यातील पांजरा येथील दोन वाळुमाफियांनी जिवघेणा हल्ला करीत मारझोड केल्याची घटना घडली.त्यातच आम्ही गोळा केलेली वाळू आणि तिचा साठा तुम्हाला लिलाव करण्याचा कुणी अधिकार दिला असे बोलून तलाठ्यांच्या हातात असलेले शासकीय कागदपत्रे फेकून घटनास्थळावरुन फऱार झाले.घटनेची माहिती लगेच उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना भ्रमणध्वनीद्वारे देण्यात आली.त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी पोलीस विभागालमा दिलेल्या माहितीनंतर रावणवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक जोकार व वांगडे यांनी घटनास्थळी दाखल होत कारवाई केली.यावेळी अप्पर तहसिलदार अनिल खळतकर,नायब तहसिलदार सचिन पाटील,गणपत शिंगाडे,तलाठी संघटनेचे अध्यक्ष सुनिल राठोड यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून मारहाण झालेले तलाठी शहारे व थुलकर यांची चौकशी करीत प्रशासन सोबत असल्याचे आश्वासन दिले.

वाळूमाफिया असलेल्या गादीराम मटाले व महेश फरकुंडे या दोंघावर 353 कलमा खाली गुन्हा दाखल करीत गादीराम मटालेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.गेल्या दोनतीन दिवसात तलाठ्यांवर हल्ला होण्याची ही दूसरी घटना असून वाळू माफियांचे मनसुबे चांगले दिसून येत नसल्याने तलाठ्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे वाळुतस्करीमध्ये गुन्हेगारी स्वरुपातील काही गोंदियातील लोकांचे पाठबळ वाळूची चोरटीवाहतूक करणार्यांना असल्याचे बोलले जात आहे.