गोंदिया,दि.30ःअवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी तक्रारदाराकडून मोबाईलची तसेच तडजोडीअंती ५ हजारांची लाच
मागणारा आरोपी शैलेश विजयकुमार तर्हाटे सहा. दुय्यम निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका देवरी हा लाच घेतांना (दि.२९) रंगेहात पकडला गेला.
सविस्तर असे की, तक्रारदाराचे हॉटेल असून त्या माध्यमातून तो किरकोळ दारू विक्री करीत असे. या प्रकरणी त्याच्यावर गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. दरम्यान आरोपी शैलेश विजयकुमार तर्हाटे साह. दुय्यम निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका देवरी याने आरोपीला अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी ७
ते ८ हजार रुपये विंâमतीचा मोबाईल घेऊन देण्याची मागणी केली तसेच तडजोडीअंती ५ हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. परंतु पैसे घेऊन व्यवसाय करण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २७ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीची पडताडणी करून (दि.२९) गोंदिया जवळ सापडा रचण्यात आला.यावेळी आरोपीने पंचासमक्ष तक्राराकडून ५ हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, सफौ. शिवशंकर तुमडे, विजय खोब्रागडे, पो.हवा. प्रदीप तुळसकर, राजेश शेंद्रे, नापोसि. रंजीत बिसेन, दिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, मनापोसि. वंदना बिसेन, चालक नापोसि. देवानंद मारबते आदींनी पार पाडली.





