नगर पंचायत : २० ऑगस्टला प्रभाग रचना,आरक्षण सोडत

0
13

गोंदिया,दि.१७ : जिल्ह्यातील देवरी, आमगाव, सालेकसा, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोर आणि गोरेगाव या ६ नगर पंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडत २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता तहसिल कार्यालय येथे होणार आहे. अनुसूचित जाती/जमातीकरीता एक जागा असल्यास पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोडतीने स्त्रीकरीता जागा राखून ठेवण्यात येईल. अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गातील प्रभागात स्त्रियांकरीता राखून ठेवावयाच्या जागेचे आरक्षण सोडतीने काढण्यात येईल. प्रभाग रचेनेचे प्रारुप व नकाशे संबंधित नगर पंचायतीच्या प्रशासकाकडे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहे. याची संबंधित नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे.