विद्येपेक्षा पैसा आणि अधिकारांना महत्त्व-जयंत नारळीकरांचे टीकास्त्र

0
9

नागपूर विद्यापीठाचा १0२ वा दीक्षांत समारंभ

नागपूर : पुरातन काळात समाजात, राजदरबारी विद्वान माणसाचा आदर होत असे. परंतु आज मात्र आपल्या देशात अशी परिस्थिती राहिलेली नाही. दुर्दैवाने विद्येच्या अलंकारापेक्षा पैसा व अधिकारच मोठे मानण्यात येत आहेत, अशा परखड शब्दांत पुणे येथील खगोलविज्ञान आणि खगोलभौतिकी आंतर विद्यापीठ केंद्राचे संस्थापक संचालक डॉ. जयंत नारळीकर यांनी एकूणच व्यवस्थेवर टीका केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १0२ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी पार पडलेल्या या सोहळ्याला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती होती. राजकारणापासून आज देशातील एकही विद्यापीठ मुक्त नाही. विद्यापीठांसोबतच विविध राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्येदेखील अधिकारशाही, लालफीतशाही व निष्क्रियता दिसून येत आहे.
विद्वानांची खरोखरच अशी प्रतिमा आहे की ज्यामुळे समाजाने त्यांना मान द्यावा, असा प्रश्नदेखील डॉ. नारळीकर यांनी उपस्थित केला. प्रगत देशांमध्ये ‘विद्वान सर्वत्र पुज्यते’ असे चित्र पहायला मिळते. रशियासारख्या देशात तर त्यांना ‘व्हीव्हीआयपी’चा दर्जा मिळतो. आपल्याकडे चांगले ध्येय ठेवलेले काही विद्वान नक्कीच आहे. परंतु त्यांच्यासाठी अनेक अडचणी असतात. उत्कृष्टतेच्या मार्गाने जाणार्‍यांना मागे खेचण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देण्यात यावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
या सोहळ्याला मंचावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सर्व शाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कोमल ठाकरे व वर्षा देशपांडे यांनी केले.

नागपूर विद्यापीठाच्या १0२ व्या दीक्षांत सोहळ्यात पदकविजेत्यांमध्ये विद्यार्थिनींचेच वर्चस्व दिसून आले. दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रियंका मुंदडा हिचा एलएलबी (पाच वर्षीय अभ्यासक्रम) परीक्षेतील यशाबद्दल १८ सुवर्णपदके व पारितोषिकांनी सन्मान करण्यात आला. हिस्लॉप महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका वाल्को हिला ‘बीएसस्सी’त सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल १३ पदके व पारितोषिके प्रदान करण्यात आली. नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर इतिहास विभागाची विद्यार्थिनी मीना पिजदूरकर, एमए (इतिहास)मध्ये सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल ११ तर रामदेवबाबा कमला नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी निहारिका जैन, ‘बीई’तून सर्वात जास्त गुणांबद्दल प्रत्येकी ११ पदके व पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. या सोहळ्यादरम्यान विविध अभ्यासक्रमांमधील १७९ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना २९४ सुवर्ण पदके, ४२ रौप्य पदके, १0२ पारितोषिके अशी एकूण ४३८ पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली.
दरम्यान, दीक्षांत समारंभाच्या वेळी ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यांनी डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोर विद्यापीठाच्या विरोधात निदर्शने केली. आदमने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. याच्या विरोधात ही निदर्शने करण्यात आली. दीक्षांत समारंभात डॉ. वसंत रायपूरकर यांना डी.लिट.ने सन्मानित करण्यात आले.

वाणिज्य विद्याशाखा
मोनाली रामटेके एमबीए एस.बी.जैन इन्स्टिट्यूट ६
सुरभी ठाकूर बीकॉम गोविंदराम सेकसरीया महाविद्यालय ५

शिक्षण विद्याशाखा
वृषाली पाथरीकर एमएड शिक्षण विभाग, नागपूर विद्यापीठ ६

अभियांत्रिकी विद्याशाखा
निहारीका जैन बीई रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय ११
हरीश मिलमिले बीई (इलेक्ट्रीकल) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर ५
चिन्मय चौधरी बीटेक (केमिकल) एलआयटी ५

समाजविज्ञान शाखा
मीना पिजदूरकर एमए (इतिहास) इतिहास विभाग, नागपूर विद्यापीठ ११
स्वाती शेंडे एमए (प्राचीन इतिहास) नागपूर विद्यापीठ ५
राहुल चुटे एमए (राज्यशास्त्र) राज्यशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ ५
शंकर खोब्रागडे एमए (आंबेडकर विचारधारा) नागपूर विद्यापीठ ६
रमेश जयनाकर एमए (समाजशास्त्र) जे.एम.पटेल महाविद्यालय, भंडारा ५
राजश्री सिंगम बॅचलर ऑफ र्जनलिझम जनसंवाद विभाग, नागपूर विद्यापीठ ८

गृहविज्ञान शाखा
शिवानी अग्रवाल बीएस्सी (होम सायन्स) एस.एस.गर्ल्स कॉलेज, गोंदिया ५

वैद्यक विद्याशाखा
जान्हवी वर्मा बीफार्म इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ५

विधी विद्याशाखा
नितू शंभरकर एलएलएम विधी विभाग, नागपूर विद्यापीठ ५
अनुज सक्सेना एलएलबी (३ वर्ष) डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय, दीक्षाभूमी १0
प्रियंका मुंदडा एलएलबी (५ वर्ष) डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय, दीक्षाभूमी १८

कला विद्याशाखा
प्राजक्ता मोंढे एम.ए. (संस्कृत) वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था ७
मधुमिता सिंह एम.ए.(इंग्रजी) मनोहरभाई कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ८
शितल पडोळे एम.ए.(मराठी) बिंझाणी नगर महाविद्यालय ८
सोनाली बोहरपी एम.ए. (संगीत) वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था ५
अंकिता चौधरी बीए हिस्लॉप महाविद्यालय ७
सुरेखा राघोर्ते बीए (मराठी) विदर्भ कला, वाणिज्य महाविद्यालय, लाखनी ५
श्रेया मुजूमदार बीए/बीएस्सी (गणित) हिस्लॉप महाविद्यालय ७

विज्ञान विद्याशाखा
आरती सिंग एमएसस्सी प्राणीशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ ५
प्रियंका वाल्को बीएसस्सी हिस्लॉम महाविद्यालय १३