कुटुंब व समाजाची खरी शिल्पकार भारतीय स्त्री

0
18

गोरेगाव दि.१: जगत कला, वाणिज्य आणि इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहास विभागाद्वारे विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्लीच्या विद्यमाने भारतात स्त्रियांची दशा व दिशा या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राची सांगता शनिवारी झाली. यात भारतीय स्त्री हीच कुटूंब व समाजाची खरी शिल्पकार आहे, असे मत डॉ. शुभा जोहरी यांनी व्यक्त केले.
डॉ.माधुरी नासरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. शुभा जोहरी यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. अतिथी म्हणून डॉ. एस.आय. कोरेटी, डॉ. भुपेश चिकटे, डॉ. पी.जी. जगताप, प्राचार्य निलकंठ लंजे, उपप्राचार्य डॉ. एस.एच. भैरम, डॉ.छाया पटले उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रीय चर्चासत्रावर आधारित लेखप्रकाशिका, लघुशोधनिबंध प्रबंधिका, जगत वार्षिकांक यांचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर डॉ. शुभा जोहरी, डॉ.भुपेश चिकटे यांनी सदर विषयावर आपले विचार मांडले. बीजभाषक डॉ. कोरेटी यांनी वैदिक काळ ते आधुनिक काळापर्यंत भारतीय स्त्रिची दशा व दिशा यावर विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. माधुरे नासरे यांनी पूर्वीपेक्षा आजच्या स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्याचे सांगितले.संचालन डॉ.सी.एस. राणे यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ.एस.एच. भैरम यांनी मानले.
पहिल्या व दुसर्‍या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.पी.डी. जगताप (जळगाव) होते. यात डॉ. अफरोज शेख, डॉ. वर्षा सुर्वे, डॉ. गोविंद तिरमनवार, डॉ. सतीष चाफले, आर.एस. मुंडोले या वक्त्यांनी सदर विषयावर मार्गदर्शन केले.संचालन प्रा.लोकेश कटरे यांनी तर आभार प्रा. आस्टनकर यांनी मानले.
समारोपी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. निलकंठ लंजे होते. अतिथी म्हणून पारख पटले, उपप्राचार्य डॉ.एस.एच. भैरम, डॉ. छाया पटले उपस्थित होते.
संचालन प्रा. आर.बी. भैरम यांनी व आभार डॉ.पटले यांनी मानले. चर्चासत्रासाठी सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतरांनी सहकार्य केले.