सुरतोली ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप

0
18

देवरी दि.१:तालुक्याच्या सुरतोली येथील ग्रामसेवक एस.जी. कोटवार यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्यांनी केली आहे.
सलग दोन वर्षापासून सामान्य निधीत गृहकर, विद्युत कर जमा केले आहेत. पण त्याची नोंद रोकडवहीत घेण्यात आलेली नाही. तंटामुक्त मोहिमेच्या पुरस्काराचे दोन लाख रुपये खर्च करण्यासाठी ग्राम सभेची परवानगी न घेता स्वमजिर्ने खर्च केली आहे. निर्मल ग्रामच्या पुरस्काराची रकमेची अफरातफरी केली आहे. सामान्य निधीतील रक्कम मोठय़ा प्रमाणात खर्च करण्यात आली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा निधीतून पाणी पट्टीची रक्कम घेण्यात आली आहे. परंतु त्याची नोंद कॅशबुक मध्ये घेण्यात आली नाही. तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून कोणतेही काम करण्यात आले नाही. बीआरजीएफ अंतर्गत करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. आंगणवाडीच्या स्लॅबचे काम बीआरजीएफ योजनेंतर्गत करण्यात आले. मात्र त्या कामासाठी तेराव्या वित्त आयोगाच्या रकमेतून पैसे विड्रॉल करण्यात आले. पर्यावरण संतुलीत ग्राम समृद्ध योजनेच्या निधीची अफरातफर झाल्याचा आरोप सरपंच भावना राऊत, उपसरपंच दिनेश भुते, वासुदेव बोरकर, चंदा ढोमणे, अनिता कोसरे, जिजा मरसकोल्हे, जगदीशसिंह पवार, रविंद्रकुमार श्रीवास्तव यांनी केला आहे.