माजी सैनिक पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

0
23

गोंदिया,दि.६ : जिल्ह्यातील माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांकडून पंतप्रधान शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याकरीता १५ नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या माजी सैनिक व विधवांचे पाल्य इयत्ता बारावीमध्ये ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत अशा दोन पाल्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत एकूण चार हजार पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीकरीता विद्यार्थ्याचे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पंजाब नॅशनल बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती अर्जाचा नमुना व संबंधित माहिती ुुु.वशीु.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीकरीता कार्यालयाच्या ९३७०२७०००१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.