बुधवारला पालकमंत्री जिल्ह्यात

0
11

गोंदिया,दि.६ : पालकमंत्री राजकुमार बडोले हे आज ७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी ११.३० वाजता रविभवन, नागपूर येथून सडक अर्जुनीकडे मोटारीने भंडारा-साकोली-कोहमारा मार्गे प्रयाण करतील. दुपारी १.३० वाजता सडक अर्जुनी येथे आगमन, राखीव व मुक्काम.