प्रोग्रेसिव्ह शाळेत हैंड-वाश डे उत्साहात

0
21

गोंदिया,दि.२५- येथील श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्थाद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह शाळेत हँड वॉश डे साजरा करण्यात आला.
या दिवसानिमित्त सर्व शालेय विद्याथ्र्यांनी हात स्वच्छ कसे ठेवावे याची माहिती देण्यात आली.कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्याथ्र्यांनी निटनिटके कसे राहावे, जेवणाअगोदर व जेवणानंतर स्वच्छ हात धुण्याचे फायदे, शरीर स्वच्छ ठेवल्याने ते निरोगी कसे राहते याची माहिती विद्याथ्र्यांना देण्यात आले. विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना संस्थाध्यक्ष पंकज कटकवार यांनी निरोगी शरीराविना चांगले विचार मनुष्याच्या मनात येऊ शकत नाही, असे म्हणाले. तसेच सचिव एन. आर. कटकवार यांनी स्वच्छतेचे महत्त्व समजावतांना स्वच्छ शरीर हीच संपूर्ण आयुष्याची गुरुकिल्ली असून स्वच्छतेतून संमृद्घीकडे जाण्याचा मार्ग दाखविते. यशस्वितेसाठी प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, आशा राव, विना कावडे, निधी व्यास, अभय गुरव, कृष्णा चव्हाण, विलास नागदेवे, असिम पसिने, भाग्यश्री शर्मा, वर्षा सतदेवे, प्रमोद वाडी, सुषमा वर्षिकर, महेंद्र हरिणखेडे, मिना सार्वे, दुर्गा रामटेककर, नगमा शाहा, रूपकला रहांगडाले, तुमेश पारधी तसेच सर्व प्रोग्रेसिव्ह शाळेच्या शिक्षकांनी सहकार्य केले.