चार विद्यार्थिनींचा सत्कार

0
12

गोंदिया  दि. १0: सन २0१३-१४ च्या उन्हाळी परीक्षेत सुयश मिळविणार्‍या एस.एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींचा नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल कॉलेजमध्ये चारही विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर व कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांच्या हस्ते सदर विद्यार्थिनींना पुरस्कार देण्यात आले. गृहशास्त्र विभागाच्या बीएससी होमसायंस अंतिम वर्षाची विद्यार्थिनी शिवानी अग्रवाल हिने नागपूर विद्यापीठातून प्रथम येवून पाच सुवर्णपदके पटकाविले. तसेच जुही करंजेकर हिने दोन सुवर्ण पदके, बीए अंतिम वर्षाची सत्वशीला पटले हिला मराठी वाङमयासाठी एक सुवर्णपदक, तसेच मनिषा चिमनानी हिला हिंदी साहित्यासाठी एक सुवर्णपदक देण्यात आले.गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन यांनी सदर विद्यार्थिनींचे कौतुक केले. महाविद्यालयातर्फे चारही विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार, डॉ. माधुरी नासरे, डॉ. राजश्री धामोरीकर, प्रा. संध्या मून, डॉ. रेखा लिल्हारे, प्रा. नीता खांडेकर, प्रा. कुर्वे, प्रा. ईश्‍वरी खटवानी, प्रा. पुंडे उपस्थित होते.