अंशकालीन कर्मचार्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0
8

गोंदिया दि. १0: जिल्ह्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघर्ष समितीच्या शेकडो कर्मचार्‍यांनी जिल्हा संघटक व्ही.एम. चौरे यांच्या नेतृत्वात तत्काळ शासकीय सेवेत घेण्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले. मात्र जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी एन.के. लोणकर यांनी स्वीकारले.
सदर निवेदनासह सर्व अंशकालीन कर्मचार्‍यांनी सर्वांचे सेवायोजन कार्ड, अनुभव प्रमाणपत्र यांची यादीसुद्धा सोबत दिली. तसेच निवेदनाच्या प्रती मंत्री व वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठविण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शैलेश बागडे, कार्याध्यक्ष योगेंद्र मिश्रा, सचिव महेश मेश्राम, नरेंद्र श्यामकुवर, सुदर्शना रामटेके, भारती यादव, कृष्णकुमार सूर्यवंशी, अतुल बोरकर, कुरैशी आदी अंशकालीन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.