व्यसनाधिनता ही युवकांपुढील समस्या-पी.जी.कटरे

0
26

गोरेगाव दि.४ : सध्याचे युग हे गतिमान युग झाले असल्याने आजचा युवक हा आधुनिकतेकडे वळला आहे. मात्र या गतिमानतेमुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी युवकांचे नित्य व्यायामाकडे दुर्लक्ष झाले असून हा युवा वर्ग दिवसेंदिवस व्यसनाच्या आहारी जात आहे.त्यामुळे व्यसनाधिनता ही युवकांपुढील सर्वात मोठी समस्या असल्याचे प्रतिपादन जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांनी केले.
नेहरू युवा केंद्र गोंदिया आणि बंधू शिक्षण प्रसारक मंडळ गणखैराच्या वतीने सटवा येथे तालुकास्तरीय आंतरयुवा मंडळ क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते पहिल्या दिवशी क्रीडा महोत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करीत होते.
अध्यक्षस्थानी तालुका खरेदी विक्री सेवा संस्थाचे संचालक जितेंद्र कटरे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रेमेंद्र कटरे, सरपंच रमेश ठाकुर, महेंद्र ठाकुर, डी.के.रहांगडाले, पोलीस पाटील टिकाराम रहांगडाले, भोजराज बघेले, पं.स.सदस्य पुष्पराज जनबंधू, डॉ.के.टी.कटरे, इंद्रराज ठाकुर, उपसरपंच उमराव कडूकार, रमेश रहांगडाले, ग्रा.पं.सदस्या पुष्पा चौधरी, शांता रहांगडाले, कौशल्या रहांगडाले, माजी सरपंचा कमला बिसेन, डॉ. बुधराम पारधी, टिकाराम पारधी, राकेश पारधी, गिरधारी ठाकुर, भिकराम चौधरी, बेनू टेंभरे, रामेश्‍वर रहांगडाले, दिलीप रहांगडाले आदी उपस्थित होते.
पुढे कटरे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षणावर आता आपले लक्ष केंद्रीत झाले असून शिक्षण संघटनाच्या बळावर राजकारण करणार्‍या व जि.प.च्या येरझर्‍या घालणार्‍यांवर आपण कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच रमेश ठाकुर यांनी प्रास्ताविकातून गावविकासाच्या मागण्यांसदर्भात प्रकाश टाकून मागण्यांचे निवेदन दिले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना जितेंद्र कटरे यांनी क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एक चांगला मंच मिळाल्याने युवकांनी त्याचा पुरेपूर उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित अतिथींनीही समयोचित मार्गदर्शन केले.तीन दिवसीय क्रिडा महोत्सवात कबड्डी, क्रिकेट, रस्सीखेच, स्लो सायकल, दौड, व्हॉलीबाल हे खेळ घेण्यात आले. सांस्कृतिक महोत्सवात सामूहिक नृत्य व एकल नृत्य यासारख्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन भागचंद्र रहांगडाले यांनी तर आभार नितीन कटरे यांनी मानले