मुंबई विद्यापीठाचे आदर्श महाविद्यालय, शिक्षक, प्राचार्यसह विविध पुरस्कार जाहीर

0
5

मुंबई, दि. ५ सप्टेंबर: शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठामार्फत देण्यात येणारे विविध पुरस्कार आज मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार (२०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२), विद्यार्थी विकास विभाग पुरस्कार (२०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२), विद्यापीठ विशेष पुरस्कार, विद्यापीठ गुणवंत अधिकारी पुरस्कार (२०२१-२२), विद्यापीठ अधिकारी विशेष पुरस्कार, महाविद्यालयीन गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (२०१९-२० व २०२०-२१), आदर्श शिक्षक/शिक्षिका पुरस्कार (महाविद्यालय विभाग) (२०१९-२० व २०२०-२१), आदर्श शिक्षक/शिक्षिका पुरस्कार (विद्यापीठ विभाग) (२०१९-२० व २०२०-२१), आदर्श प्राचार्य पुरस्कार (२०१९-२० व २०२०-२१), आदर्श महाविद्यालय पुरस्कार (२०१९-२० व २०२०-२१) या पुरस्कारांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र.कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव प्रा. शैलैन्द्र देवळाणकर यांच्याहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठीचे आदर्श महाविद्यालयाचे पुरस्कार ग्रामीण विभागातून  लोकनेते गोपीनाथजी मुंडे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, मंडणगड, जि. रत्नागिरी यांना प्रदान करण्यात आला तर शहरी विभागातून विल्सन कॉलेज, चौपाटी, मुंबई यांना प्रदान करण्यात आले. २०२०-२१ साठीचे आदर्श महाविद्यालयाचे ग्रामीण विभागातील पुरस्कार आनंदीबाई रावराणे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग आणि शहरी विभागातील चेतनाज हजारीमल सोमाणी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, श्रीमती कुसुमताई चौधरी कॉलेज ऑफ आर्ट्स, वांद्रे, मुंबई आणि फादर सी. रॉड्रीक्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉंजी, वाशी, नवी मुंबई यांना प्रदान करण्यात आले.

२०१९-२० साठीचे आदर्श प्राचार्य पुरस्कार ग्रामीण विभागातून डॉ. भगवान राजपूत आणि डॉ. दीलिप भारमल यांना प्रदान करण्यात आले तर शहरी विभागातून डॉ. गोरक्ष पारगावकर यांना प्रदान करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा आदर्श प्राचार्य पुरस्कार ग्रामीण विभागातून डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि शहरी विभागातून डॉ. अजय भामरे यांना प्रदान करण्यात आला.

 

याचबरोबर २०१९-२० साठीचे आदर्श शिक्षक/शिक्षिका पुरस्कार महाविद्यालय स्तरावरील ग्रामीण विभागातून डॉ. किरण सावे, शहरी विभागातून डॉ. संगिता जोशी यांना प्रदान करण्यात आले. २०२०-२१ साठीचे ग्रामीण विभागातून डॉ. बबन जाधव आणि शहरी विभागातून डॉ. भोलानाथ मुखर्जी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविन्यात आले.

विद्यापीठ स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार २०१९- २० साठी डॉ. विश्वनाथ पाटील आणि डॉ. नविनचंद्र शिंपी यांना प्रदान करण्यात आले.

२०२१-२२ साठीचे विद्यापीठ गुणवंत अधिकारी पुरस्काराचे मानकरी म्हणून उपकुलसचिव नरेंद्र खलाणे, सहाय्यक कुलसचिव दिपक मोरे आणि निवृत्त उपकुलसचिव रवींद्र साळवे यांना पुरस्कार देऊन गौरविन्यात आले. कोरोना काळात शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मंदार भानुशे सहाय्यक प्राध्यापक, दूर व मुक्त अध्ययन संस्था, मुंबई विद्यापीठ यांना विद्यापीठ विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर महाविद्यालयीन गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार, विद्यार्थी विकास विभाग पुरस्कार आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध पुरस्कार मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थिताना संबोधित करताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी मागील चाडे चार वर्षात विद्यापीठाने केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचा उल्लेख केला. विविध शैक्षणिक, संशोधन आणि अध्यासन केंद्र, सिंधुदुर्ग उपपरिसराची स्थापना, नॅक आणि एनआयआरएफ रँकिंगमधील सुधारणा, विविध पदविका, प्रमाणपत्र, पदवी आणि पदव्यूत्तर स्तरावरील शैक्षणिक अभ्यासक्रम आणि पीएचडीचे नवीन अभ्यासक्रम अशा विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केले. तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्या सर्वांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार प्रभारी कुलसचिव प्रा. शैलेंद्र देवळाणकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. नीतिन आरेकर यांनी केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाचे वास्तूवैभव यावर आधारीत चित्रफित प्रदर्शित करण्यात आली.