चित्रकला महाविद्यालयात कला प्रदर्शन

0
7

गोंदिया : येथील प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयात मंगळवारी वार्षिक कला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. उद््घाटन राज्य चित्रकला व शिल्प विभागीय कार्यालयाचे सहायक निरीक्षक संदीप डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नागपूरच्या शरद पवार चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य अमोल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून उप विभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड, बिल्डर अनिल पशिने, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजू सोनवाने, मनोज ताजणे, मिलिंद वाढई, प्रा. सचिन खवले, संस्था अध्यक्ष पंकज कटकवार, सचिव नीरज कटकवार व मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांनी कला प्रदर्शनीचे अवलोकन करून उत्कृष्ट कलाकृतीसाठी फाऊंडेशन अभ्यासक्रमातून प्रथम शुभम गोलीवार, द्वितीय बालचंद राऊत, तृतीय जयश्री मडकवार, प्रोत्साहन एकता करोसिया तर एटीडी अभ्यासक्रमातून प्रथम वर्षातून प्रथम वैभव मेश्राम, द्वितीय विजय कटरे, तृतीय लोकेश नखाते व प्रोत्साहन गुरूदास भेलावे, रिमा पॉल यांना तसेच द्वितीय वर्षातून प्रथम किरण बानेवार, द्वितीय प्रिती पारधी, तृतीय मोवा जीवतोडे व प्रोत्साहन सपना संतानी यांना पुरस्कार दिला.