चक्रीवादळाचा फटका : ४५ घरांची पडझड

0
5

गोरेगाव दि.२ ८ : तालुक्यातील मुरदोली येथे शुक्रवारी (दि.२६) रात्री  आलेल्या गारपीट व चक्रीवादळामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात एकूण ४५ घरांना हाणी पोहोचली.
प्राप्त माहितीनुसार,  जोरदार पावसाने, चक्रीवादळ, गारपीठीसह हजेरी लावली. यात मोठमोठी झाडे उन्मळून पडली तर मुरदोली येथील नानू सयाम, रुपचंद परतेती, संतोषी टेकाम यांच्या घरावरील छत उडाले. मदनलाल भेंडारकर यांच्या मालकीचा गुराचा गोठा जमीनदोस्त झाला. इतर ४१ लोकांचे घरावरील कवेलू उडाले.
गोंदिया-कोहमारा मार्गावरील झाडे उन्मळून पडल्यामुळे काही वेळासाठी वाहतूक बंद पडली होती. वेळीच मुरदोलीचे सरपंच शशी भगत यांनी काही गावकर्‍यांना घेवून रस्ता पूर्ववत केला व वाहतूक सुरळीत सुरू झाली. २४ तासापासून मुरदोली येथे वीज पुरवठा बंद असून अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह खंडित झाला आहे